थेपडे विद्यालयात आकाशकंदील निर्मिती व दिवे सजावट कार्यशाळा उत्साहात संपन्न!
मुख्य संपादक दिनेश सोनवणे इको क्लबच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कलाकृती; दिवाळीच्या सणासाठी कलात्मक सजावटीला बहर म्हसावद, ता. जि. जळगाव (दि. २२ ऑक्टोबर २०२६) : स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथे इको क्लब अंतर्गत ‘आकाशकंदील व दिवे सजावट कार्यशाळा २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना सुंदर कलाकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त केले. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, सजावटीचे साहित्य आणि उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले. तसेच साध्या मातीच्या दिव्यांना सुंदर रंगसंगती, नक्षीकाम आणि कल...