थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट
धावणे, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी व रिलेत उल्लेखनीय यश; ४×१०० मीटर रिलेत प्रथम क्रमांक म्हसावद : जळगाव येथील क्रीडा संकुलावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावदच्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची दमदार चुणूक दाखवत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. धावण्याच्या विविध प्रकारांसह गोळाफेक, भालाफेक, लांब उडी आणि रिले स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. १४ वर्षांखालील १०० मीटर धावण्यात विशाल भीमा शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील गटात मोहित धनगर याने ३००० मीटर धावणे व गोळाफेकमध्ये दुहेरी प्रथम क्रमांक मिळविला. ३००० मीटरमध्ये अस्लम पठाण याने द्वितीय, १५०० मीटरमध्ये रोहन मेघराज जाधव याने द्वितीय, तर ८०० मीटरमध्ये तुषार सुनील पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. भालाफेकमध्ये यश सुभाष कोळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीत हितेश धनगर याने द्वितीय, तर अनंत कोळी याने तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील गटातही थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. कार्तिक गोपाल राठोड ...