थेपडे विद्यालयाचे प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांचा ‘शिक्षक गौरव' पुरस्काराने सन्मान

दि. 13 सप्टेंबर 2026

संपादक दिनेश सोनवणे 

म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगांव या विद्यालयाचे प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक योगदानाची दखल घेत बंसल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने त्यांना ‘शिक्षक गौरव व सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

बंसल क्लासेस, जळगावचे डायरेक्टर हेमंत अगीवाल सर आणि डायरेक्टर समीर मोहिते सर यांच्या हस्ते प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस जे पवार सर सुद्धा उपस्थित होते.

प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच, शिवाय विद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांसाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांना आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला प्रोत्साहन दिले जात आहे.

या पुरस्काराबद्दल प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांचे विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.



Comments

Popular posts from this blog

थेपडे विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

थेपडे विद्यालयात शाडू मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई पाटील यांची साखरतुला