Posts

थेपडे विद्यालयात आकाशकंदील निर्मिती व दिवे सजावट कार्यशाळा उत्साहात संपन्न!

Image
मुख्य संपादक दिनेश सोनवणे  इको क्लबच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कलाकृती; दिवाळीच्या सणासाठी कलात्मक सजावटीला बहर म्हसावद, ता. जि. जळगाव (दि. २२ ऑक्टोबर २०२६) : स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथे इको क्लब अंतर्गत ‘आकाशकंदील व दिवे सजावट कार्यशाळा २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना सुंदर कलाकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त केले. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, सजावटीचे साहित्य आणि उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले. तसेच साध्या मातीच्या दिव्यांना सुंदर रंगसंगती, नक्षीकाम आणि कल...

थेपडे विद्यालयात ओम शांती केंद्रातर्फे विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन

Image
 मुख्य संपादक दिनेश सोनवणे  म्हसावद : स्वा. से. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता. जि. जळगाव येथे ओम शांती केंद्र, म्हसावद यांच्या वतीने इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या ब्रह्माकुमारी राजश्री दीदी (एम.एस्सी., व्हॅल्यू एज्युकेशन) यांनी विद्यार्थिनींना जीवनमूल्ये, संस्कार, बदलती जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर होते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थिनींच्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये तसेच राहणीमानामध्ये अनेक बदल घडून येत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि संस्कारांची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांनी केले. विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात चांगले विचार, उत्तम आचरण, शिस्त आणि आत्मविश्वास यांना महत्त्व द्यावे, असेही त्यांनी सांगितले. नवरात्रीतील...

थेपडे विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्वातून मांडले महात्मा गांधींच्या जीवनकार्याचे विविध पैलू  मुख्य संपादक डी एम सोनवणे  म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता. जि. जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावीपणे आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर, उपप्राचार्य श्री. के. पी. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एस. जे. पवार सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एम. नेतकर सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. अनिता नेवे मॅडम तसेच श्री. ए. सी. बाविस्कर सर यांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्...

थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट

Image
धावणे, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी व रिलेत उल्लेखनीय यश; ४×१०० मीटर रिलेत प्रथम क्रमांक म्हसावद : जळगाव येथील क्रीडा संकुलावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावदच्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची दमदार चुणूक दाखवत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. धावण्याच्या विविध प्रकारांसह गोळाफेक, भालाफेक, लांब उडी आणि रिले स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. १४ वर्षांखालील १०० मीटर धावण्यात विशाल भीमा शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील गटात मोहित धनगर याने ३००० मीटर धावणे व गोळाफेकमध्ये दुहेरी प्रथम क्रमांक मिळविला. ३००० मीटरमध्ये अस्लम पठाण याने द्वितीय, १५०० मीटरमध्ये रोहन मेघराज जाधव याने द्वितीय, तर ८०० मीटरमध्ये तुषार सुनील पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. भालाफेकमध्ये यश सुभाष कोळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीत हितेश धनगर याने द्वितीय, तर अनंत कोळी याने तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील गटातही थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. कार्तिक गोपाल राठोड ...

थेपडे विद्यालयाच्या विज्ञान नाटिकेची तालुकास्तरावर दमदार कामगिरी; तृतीय क्रमांक पटकावला

Image
मुख्यसंपादक डी. एम. सोनवणे  म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगांव या विद्यालयाने शिक्षण विभाग समिती, जळगाव यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६–२७ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत विद्यालयाच्या नाटिकेने तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन मा. श्री. अजितदादा तडवी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जळगाव यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. खलील शेख, प्रशासन अधिकारी, मनपा जळगाव उपस्थित होते. विज्ञान नाटिकेच्या परीक्षक म्हणून वर्षा महाले व वृषाली चौधरी या ज्येष्ठ विज्ञान शिक्षिकांनी जबाबदारी पार पाडली. थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकेने आपल्या प्रभावी अभिनयातून, आशयपूर्ण मांडणीतून आणि सादरीकरणातील कल्पकतेतून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता ७ वी, ८ वी व ९ वी मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर केला. विज्ञान व...

थेपडे विद्यालयाच्या मयुरेश धनगरची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दमदार बाजी

Image
संपादक दिनेश सोनवणे  म्हसावद : अमर संस्था, चोपडा आयोजित मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. १५ सप्टेंबर २०२६, मंगळवार रोजी बालमोहन विद्यालय शैक्षणिक संकुल, चोपडा येथे करण्यात आले. या स्पर्धेत स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथील इयत्ता दहावी ‘अ’चा विद्यार्थी मयुरेश महेंद्र धनगर याने द्वितीय गटात (इयत्ता आठवी ते दहावी) आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. मयुरेश धनगर याने आत्मविश्वासपूर्ण मांडणी, प्रभावी भाषाशैली, विषयाचे सखोल आकलन आणि ओघवत्या वक्तृत्वाच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व सत्कार समारंभप्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखांतील संस्थांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता मयुरेश धनगर याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस जे पवार सर व श्री एस सी बाविस्कर सर उप...

थेपडे विद्यालयाचे प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांचा ‘शिक्षक गौरव' पुरस्काराने सन्मान

Image
दि. 13 सप्टेंबर 2026 संपादक दिनेश सोनवणे  म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगांव या विद्यालयाचे प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक योगदानाची दखल घेत बंसल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने त्यांना ‘शिक्षक गौरव व सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य श्री जी. डी. बच्छाव सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्र...