थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट

धावणे, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी व रिलेत उल्लेखनीय यश; ४×१०० मीटर रिलेत प्रथम क्रमांक



म्हसावद : जळगाव येथील क्रीडा संकुलावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावदच्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची दमदार चुणूक दाखवत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. धावण्याच्या विविध प्रकारांसह गोळाफेक, भालाफेक, लांब उडी आणि रिले स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली.

१४ वर्षांखालील १०० मीटर धावण्यात विशाल भीमा शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील गटात मोहित धनगर याने ३००० मीटर धावणे व गोळाफेकमध्ये दुहेरी प्रथम क्रमांक मिळविला. ३००० मीटरमध्ये अस्लम पठाण याने द्वितीय, १५०० मीटरमध्ये रोहन मेघराज जाधव याने द्वितीय, तर ८०० मीटरमध्ये तुषार सुनील पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. भालाफेकमध्ये यश सुभाष कोळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीत हितेश धनगर याने द्वितीय, तर अनंत कोळी याने तृतीय क्रमांक मिळविला.

१९ वर्षांखालील गटातही थेपडे विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. कार्तिक गोपाल राठोड याने ८०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळविला. राधेश्याम रामेश्वर चव्हाण याने २०० व १५०० मीटर धावण्यात प्रथम, तर ३००० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. हरिओम चित्ते याने ४०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

१०० मीटर धावण्यात रोशन महाजन याने प्रथम, तर योगेश बडगुजर याने द्वितीय क्रमांक मिळविला. ३००० मीटरमध्ये रेहान कालू पटेल याने प्रथम क्रमांक पटकावला. गोळाफेकमध्ये योगेश फुलचंद बडगुजर याने प्रथम, तर लांब उडीत रोशन महाजन याने तृतीय क्रमांक मिळविला.

दरम्यान, ४×१०० मीटर रिले स्पर्धेत रोशन महाजन, योगेश बडगुजर, राधेश्याम चव्हाण, हरिओम चित्ते व जयेश साळुंखे यांच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आर. आय. गिरासे तसेच प्राध्यापक मयूर जाधव व पराग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल प्राचार्य जी. डी. बच्छाव, उपप्राचार्य के. पी. पाटील, पर्यवेक्षक एस. जे. पवार, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

थेपडे विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

थेपडे विद्यालयात शाडू मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई पाटील यांची साखरतुला