थेपडे विद्यालयाच्या विज्ञान नाटिकेची तालुकास्तरावर दमदार कामगिरी; तृतीय क्रमांक पटकावला




मुख्यसंपादक डी. एम. सोनवणे 

म्हसावद : स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगांव या विद्यालयाने शिक्षण विभाग समिती, जळगाव यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६–२७ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत विद्यालयाच्या नाटिकेने तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन मा. श्री. अजितदादा तडवी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जळगाव यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. खलील शेख, प्रशासन अधिकारी, मनपा जळगाव उपस्थित होते. विज्ञान नाटिकेच्या परीक्षक म्हणून वर्षा महाले व वृषाली चौधरी या ज्येष्ठ विज्ञान शिक्षिकांनी जबाबदारी पार पाडली.

थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकेने आपल्या प्रभावी अभिनयातून, आशयपूर्ण मांडणीतून आणि सादरीकरणातील कल्पकतेतून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता ७ वी, ८ वी व ९ वी मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर केला. विज्ञान विषयाची प्रभावी मांडणी, अभिनय, संवादफेक, संगीत आणि सादरीकरण यांचा सुरेख मेळ साधत विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर आपली वेगळी छाप पाडली.

या नाटिकेचे दिग्दर्शन श्री. वाय. एन. शिंदे सर यांनी केले, तर सहदिग्दर्शन व म्युझिक डायरेक्शन श्री. डी. एम. सोनवणे सर यांनी केले. तबलावादनाची संगीतसाथ संगम भरत धनगर इ. 10वी ब यांनी दिली. विज्ञान विषय समिती प्रमुख श्रीमती योगिता पाटील मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती व्ही एम सूर्यवंशी मॅडम यांनी नाटिकेच्या सादरीकरणावेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे नाटिकेने परीक्षकांसह उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि तृतीय क्रमांकाची मानाची कामगिरी बजावली. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी उभारी मिळाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव सर, उपप्राचार्य श्री. के. पी. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एस. जे. पवार सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी कलाकार, दिग्दर्शक, मार्गदर्शक शिक्षक आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला विज्ञानाची जोड आणि कलाविष्काराची ताकद मिळाल्याने थेपडे विद्यालयाच्या विज्ञान नाटिकेने तालुकास्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.

Comments

Popular posts from this blog

थेपडे विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

थेपडे विद्यालयात शाडू मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई पाटील यांची साखरतुला