थेपडे विद्यालयाच्या मयुरेश धनगरची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दमदार बाजी


संपादक दिनेश सोनवणे 

म्हसावद : अमर संस्था, चोपडा आयोजित मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. १५ सप्टेंबर २०२६, मंगळवार रोजी बालमोहन विद्यालय शैक्षणिक संकुल, चोपडा येथे करण्यात आले.

या स्पर्धेत स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथील इयत्ता दहावी ‘अ’चा विद्यार्थी मयुरेश महेंद्र धनगर याने द्वितीय गटात (इयत्ता आठवी ते दहावी) आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.

मयुरेश धनगर याने आत्मविश्वासपूर्ण मांडणी, प्रभावी भाषाशैली, विषयाचे सखोल आकलन आणि ओघवत्या वक्तृत्वाच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व सत्कार समारंभप्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखांतील संस्थांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता मयुरेश धनगर याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस जे पवार सर व श्री एस सी बाविस्कर सर उपस्थित होते. 

मयुरेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री जी डी बच्छाव सर, उपप्राचार्य श्री के पी पाटील सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

थेपडे विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

थेपडे विद्यालयात शाडू मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई पाटील यांची साखरतुला